# 1876: "पत्नी हुशार असेल तर संसार अधिक उत्तम होतो". (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Update: 2025-10-21
Description
लोनपोगारनं सकाळीच आपल्या मुलाला बोलावलं आणि म्हणाला,
“बाळा, ह्या शंभर मेंढ्या घेऊन शहरात जा, पण हे लक्षात ठेव — ना त्यांना मारायचं, ना विकायचं!
आणि तरीही शंभर पोती जव घेऊनच परत यायचं.
तो शहरात एका रस्त्याच्या कडेला पाणावलेल्या डोळ्यांनी बसला.
तेवढ्यात एक सुंदर तरुणी आली, म्हणाली —
“काय झालं रे? एवढं चिंतातुर का?” त्याची हकीकत ऐकल्यावर
ती हसली आणि म्हणाली —
“अरे एवढंच? मेंढ्यांची लोकर काढून विक आणि त्या पैशात शंभर पोती जव घेऊन घरी जा!”. मुलगा खुश झाला !
Comments
In Channel



